सोमेश्वर रिपोर्टर टीम------
परिंचे : प्रतिनिधी
परिंचे (ता.पुरंदर) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांना पुस्तक संच व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी स्कूल कमिटीच्या सदस्या शैला संजय जाधव यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
यावेळी गावचे उपसरपंच दत्तात्रय राऊत, रवींद्र जाधव, नीता जाधव मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश गोरेगावकर यांनी कोरोना लसीकरणाचे महत्व त्याचबरोबर गणवेश पूर्तता तसेच शाळा उपयोगी आवश्यक असणाऱ्या वस्तू संदर्भात सूचना दिल्या . कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपसरपंच दत्तात्रय राऊत यांनी शाळेचा पहिला दिवस आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सेवानिवृत्त प्राध्यापक तसेच गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी नवले यांनी शाळेचे महत्व आणि पहिल्या दिवसापासूनच शाळे संदर्भात आवश्यक असणाऱ्या गोष्टी या संदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी हनुमंत माहूरकर,काजल जाधव, सुप्रिया जाधव, जयश्री गोडबोले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक महेश गोरेगावकर यांनी शाळेत करण्यात आलेल्या सुधारणा नविन शैक्षणिक धोरण तसेच माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातून शाळेला मिळालेली मदत याची माहिती दिली.यावेळी दत्तात्रय बनकर , किरण शेटे ,विश्वास भोसले, देवानंद धोंडगे, तुकाराम जाधव, राजेंद्र वाघोले आदी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा वळकुंदे व योगिनी शेवते यांनी केले आणि या कार्यक्रमाचे आभार नंदिनी दुधाळ यांनी मानले.
COMMENTS