सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात पहिल्याच दिवशी शंभर टक्के हजेरी
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद चालू -चालू बंद असा प्रकार सुरू होता .मात्र यंदा नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून २०२२ ला झाली असून पहिल्या दिवशी शाळेची घंटा वाजताच चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा दनानल्या आहेत.
भोर तालुका दुर्गम डोंगरी असला तरी तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर तसेच गावोगावी २७४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची उत्तम सोय आहे. तालुक्यातील अनेक पंचक्रोशीच्या मध्यवर्ती ठिकाणी माध्यमिक विद्यालय तर शहरात विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय आहे.तालुक्यात सर्वत्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के हजेरी लावल्याचे चित्र होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवागतांचा बैलगाडीमध्ये मिरवणूक काढून प्रवेश उत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देत गणवेश,पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.यावेळी शाळांमधील व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------
शाळा भरल्याने पालक आनंदित----
मागील दोन वर्षांपासून कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते.मात्र यंदा नवीन शैक्षणिक वर्षात शाळा वेळेत सुरू झाल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र भोर तालुक्यात आहे.
COMMENTS