सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील अंतरराष्ट्रीय खेळाडू जगन्नाथ लकडे यांनी तालुका क्रीडा अधिकारी म्हणून काम करत असताना बारामतीचा क्रीडा विकास करून बारामतीच्या वैभवात भर टाकली. काही महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर यापदी नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या कामाची पद्धत पाहून शासनाने उस्मानाबाद(धाराशिव) याठिकाणी श्रीमती मीरा रायबान या नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी जगन्नाथ लकडे यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने (उस्मााबाद) धाराशिव मध्ये खेळाडू कोचेस,।क्रीडा प्रेमी तर्फे स्वागत करण्यात येत आहे.
उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर सुधीर मोरे यांनी त्यांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
COMMENTS