सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मी वटपौर्णिमेला जात नाही असे बोलले पण मी असे नाही बोलले की तुम्ही वडाचे पूजन करू नका. मी माझ्या त्या वड पूजनाच्या त्या मुद्यावर अजूनही ठाम असल्याचे सांगत माझ्यावर टीका झाली पण मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. याबाबत ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. त्यांनी कारवाईला सामोरे जावे असे मत राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ता बारामती येथे नितीन यादव यांच्या निवासस्थानी चाकणकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी पुणे बस वाहतूक नियंत्रक रमाकांत गायकवाड, करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड, सपोनि सोमनाथ लांडे, उसपोनि योगेश शेलार, सोमेश्वर कारखान्याचे कामगार अधिकारी दीपक निंबाळकर, जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, दिलीप पवार, सागर गायकवाड, हरिष गायकवाड, धीरज गायकवाड, मंगेश गायकवाड, आकाश सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रुपाली चाकणकर पुढे म्हणाले, समाज काय म्हणेल म्हणून वड पुजायला जाणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. मी जात नाही तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही ठरवा, मी काय केले ते मी सांगितले. वाढती लोकसंख्या बदलते तंत्रज्ञानच्या युगात आपल्यात बदल करणे गरजेचे आहे असे चाकणकर यांनी सांगितले.