सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर - प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील वीसगाव खोऱ्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आंबाडे ता. भोर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी हेमलता मिलिंद खोपडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी सरपंच कविता मनोज खोपडे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग लहारे यांनी हेमलता खोपडे यांना विजयी घोषित केले. सात सदस्य संख्या असलेल्या आंबाडे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे पाच आणि काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. परंतु राज्यातील महाविकास आघाडी प्रमाणे ग्रामपंचायतीमधील कारभार एकत्रितपणे आणि एकमताने सुरू आहे. शासनाच्या ग्रामस्तरावरील असलेल्या योजना राबविण्याबरोबरच महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी विशेष काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच हेमलता खोपडे यांनी सांगितले.