सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्याला काल वादळाचा फटका बसला काही ठिकाणी झाडे पडून वाहतूक ठप्प झाली. काल रात्रीच्या वादळात वाणेवाडी मुरूम रस्त्यावर अजयश्री मंगल कार्यालयाजवळ एक बाभळीचे झाड पडले होते. विजांचा कडकडाट आणि वारा सोसाट्याचा असल्याने रस्त्यावर पडलेले झाड न दिसल्याने मुरूम ता बारामती येथील एक युवक गंभीररीत्या जखमी झाला आहे. आदित्य जगताप असे त्याचे नाव आहे.
आदित्यचा अपघात झाल्यावर पाठीमागून येणारे महादेव निंबाळकर व इतर ग्रामस्थांनी आदित्यला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
--------
डॉ. विद्यानंद भिलारे
आदित्यच्या डोक्याला मार लागला आहे. मेजर इंजुरी आहे. मानेला देखील मार लागला आहे. मात्र त्याची परिस्थिती सद्या बरी आहे.