सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कुडली खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडली खुर्द ता.भोर च्या शाळेचे गुरुवार दि.१४ रात्री अकराच्या दरम्यान जोरदार वाऱ्याच्या झोकात पत्रे उडून गेले आहेत.तर शाळेचे शैक्षणिक साहित्य भिजून लाखो रुपयांचे शाळेचे नुकसान झाले.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू असून या पावसात शेती,घरे तसेच कुडली खुर्दच्या शाळेची पडझड होऊन नुकसान झाले आहे तर घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.अजूनही पावसाचा जोर कायम आहे.शाळेच्या पत्र्यांवर मुंढरी टाकली असती तर पत्रा उडाला नसता असं ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.मागील दोन वर्षात या जिल्हा परिषद शाळेचे शाळेचे दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.दोन वर्षात जर शाळेचे पत्रे उडून नुकसान होत असेल तर ठेकेदाराच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.