बारामती ! रोटरी क्लबकडून माळेगाव आयटीआयमध्ये तीन हजार झाडांचे वृक्षारोपण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
माळेगाव : प्रतिनिधी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बु|| ता.बारामती राष्ट्रीय सेवा योजना,रोटरी क्लब बारामती व सामाजिक वनीकरण विभाग बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने 3000 देशी झाडांचे वृक्षारोपण या संस्थेत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्राचार्य गरदडे साहेब यांनी मान्यवरांचे स्वागत केले.याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी योगेश घोडके (वनपरिक्षेत्राधिकारी सामाजिक वनीकरण बारामती) गणेश सरोदे( वनपाल सामाजिक वनीकरण बारामती) दयानंद अवघडे (नियत क्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण बारामती) निखिल मुथा (असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब ऑफ बारामती) अजय दरेकर (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ बारामती) डॉक्टर हनुमंत पाटील (उपाध्यक्ष रोटरी क्लब बारामती)अरविंद गरगटे(सचिव रोटरी क्लब बारामती)दत्तात्रेय बोराटे(पर्यावरण समिती प्रमुख रोटरी क्लब बारामती)रविकिरण खारतोडे,संजय दुधाळ,डॉक्टर अमोल खानवरे,संजय खाडे ,अली अजगर बारामतीवाला,संदीप गुजर,हर्षवर्धन पाटील अतुल गांधी,किशोर मेहता,सचिन मदने,श्रीमती दर्शना गुजर,अंजली गांधी,उज्वला मेहता,नसरीन बारामतीवाला,इनसीया बारामतीवाला,सेजल गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.हा उपक्रम प्राचार्य डी एन गरदडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटनिदेशक तथा कार्यक्रम अधिकारी सपकळ एस एम व गटनिदेशक ओव्हाळ आर ए यांच्या नियंत्रणाखाली हा राबविण्यात आला.याप्रसंगी प्राचार्य गरदडे साहेब यांनी दोन दिवसांमध्ये वनीकरणासाठी केलेल्या तयारीबद्दल गटनिदेशक सपकळ सर आणि सर्व टीमचे अभिनंदन केले.तसेच गटनिदेशक तथा कार्यक्रम अधिकारी सपकळ एस एम यांनी या अभियानाची रुपरेषा आणि नियोजन सांगितली यामध्ये संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी पाच झाडे लावावीत तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने प्रत्येकी चार झाडे याप्रमाणे नेमून दिलेल्या ठिकाणी वृक्षारोपण करावे* अशी सूचना दिली आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थ्यांनी वृक्षारोपण केले. संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गटनदेशक तथा कार्यक्रम अधिकारी सपकळ एस एम यांनी आभार व्यक्त केले.या उपक्रमामध्ये विद्या प्रतिष्ठान डॉ. सायरस पुनावाला स्कूल, अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कुल आणि बालविकास मंदिर बारामती स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी संस्थेतील सर्व कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
To Top