सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या भाटघर वीज निर्मिती केंद्रात दरवर्षी अतिवृष्टीमुळे पाणी जाऊन वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.परंतु शासनाने वीजनिर्मिती केंद्राच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध केला आहे.लवकरच नूतनीकरनचे होणार आसल्याचे प्रतिपादन आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या उज्वल भारत उज्वल भविष्य कार्यक्रमात आमदार संग्राम थोपटे यांनी केले..
वेनवडी ता.भोर येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार थोपटे बोलत होते.यावेळी पाँवर ग्रिड काँपोरेशन आँफ इंडीयाचे वरिष्ठ महाप्रबंधक एच लल्लियनसियामा, महावितरणचे पुणे ग्रामीणचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार, गणेशखिंडचे अधिक्षक अभियंता सतीश राजदिप, बारामती ग्रामीण मंडळ अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, मुख्य अभियंता सुनिल पावडे, सी. ओ ई पी संचालक मूकुल सुतावणे, भोरचे उपअभियंता संतोष चव्हाण, शाखा अभियंता सचिन राऊत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील आदींसह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आमदार थोपटे यांनी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांनी अतीदुर्गम भागातही उत्तम काम केल्याबद्दल अभिनंदन केले.पुढील काळात वीजेबरोबर सौर उर्जेच्या माध्यमातून अल्प भूधारक शेतकरी स्वयमपूर्ण होईल असा विश्वास रणजित शिवतरे यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक चंद्रशेखर पाटील यांनी प्रास्ताविकात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महावितरण ने केलेल्या कामांची माहिती दिली. सुनिल देवकर यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन कुलकर्णी यांनी आभार मानले.