रायरेश्वर किल्ला ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! रायरेश्वर गडावर ट्रेकिंगला जाताना बारामतीच्या महाविद्यालयीन युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोटर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
 बारामती शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील  १२ वी ऑग्री विद्यार्थी शुभम प्रदीप चोपडे वय-१७ या विद्यार्थ्यांचा भोर तालुक्यातील रायरेश्वर गडाच्या पायथ्याशी झांबुळवाडी (कोर्ल ) ता.भोर येथून चालत ट्रेकिंग करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.                                                        
बारामतीहून भोर येथील रायरेश्वर किल्ल्यावर विद्यालयातील ४६ विद्यार्थी व शिक्षक ट्रेकिंगसाठी जात असताना शुक्रवार दिं.२९ सकाळी साडेनऊ दहाच्या शुभम चोपडे याचा मित्रांबरोबर ट्रेक करीत असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.शुभम यास जवळच असणाऱ्या प्राथमिक केंद्र आंबवडे ता.भोर येथे उपचारासाठी आणण्यात आले मात्र उपचारापूर्वीच शुभम याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.शुभम हा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावचा रहिवासी असून तो बारामती येथे शिक्षण घेत होता.
                                           
To Top