जावली ! सातारा जिल्हा गटसचिव पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव जुनघरे तर उपाध्यक्षपदी विजय चव्हाण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : प्रतिनिधी धनंजय गोरे 
सातारा जिल्हा गटसचिव सहकारी पतसंस्थेची विशेष सभा श्री बाळासो भोसले यांचे अध्यक्षते खाली पार पडली सदर सभेमध्ये संस्थेच्या चेअरमन पदी जावळीचे आनंदराव हरीबा जुनघरे व व्हा चेअरमनपदी खटावचे विजय रामचंद्र चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करणेत आली  यावेळी श्री चतुर साहेब उपस्थित होते सर्व संचालकांना सोबत घेवून संस्थेचे काम करणार असलेची ग्वाही चेअरमन जुनघरे यांनी दिली

त्याप्रसंगी शंकर पाडुरंग शिंदे माण शांताराम कृष्णा लोटेकर सातारा  दादासो बाबुराव माने कराड  ज्ञानदेव लक्ष्मण क्षीरसागर कोरेगाव  बाळकृष्ण भिकू सोनावणे वाई  धनाजी निवृत्ती शिंदे फलटण दिपक संपतराव कचरे पाटण विलास नारायण व्होवाळ खंडाळा मनिषा अनिल जाधव पाटण भारती राजेंद्र कदम फलटण अर्जुन नामदेव गुरव कराड हणमंत बाळकृष्ण पवार भिकु महिंबु खरात माण उपस्थीत होते चेअरमन व्हा चेअरमन निवडी बद्दल जिल्ह्यातुन सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे .
To Top