सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मुगटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. देविदास वायदंडे यांची निवड करण्यात आली होती.
डॉ वायदंडे हे गेली १० महिने झाले काकडे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून कामकाज पाहत होते. काल दि २८ रोजी काकडे महाविद्यालयात प्राचार्य पदाच्या मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी चार उमेदवार हजार होते. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आठ पदाधिकाऱ्यांनी या मुलाखती घेतल्या. यामधून डॉ वायदंडे यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, सचिव जयवंतराव घोरपडे, सहसचिव सतिश लकडे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.