वाई ! प्रतिनिधी : दौलतराव पिसाळ ! वाई शहरातून चार आणि महाबळेश्वर येथून दोन दुचाकी जप्त : डिबी पथकाची धडाकेबाज कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी 
वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली डिबी पथकाने वाईच्या सिद्धनाथवाडी येथे सापळा लावुन दोन तरुणांना मोपेड दुचाकीवर फिरत असताना ताब्यात घेऊन कसुन चौकशी  केली असता त्यांनी वाई शहरात चार आणी महाबळेश्वर येथुन दोन मोटरसायकल चोरुन नेहल्याची कबुली चोरट्यांनी दिल्याने त्यांच्या कडून तब्बल एका बुलेट सह तीन लाख रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल जप्त करण्यास पथकाला यश आल्यामुळे वाई शहरातील नागरीकांनी वाई पोलिस ठाण्याचे अभिनंदन केले आहे . 
          वाई पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते या अज्ञात चोरट्यांच्या टोळीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना दिले होते या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्या साठी डिबी पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के महिला पोलिस नाईक सोनाली माने कॉस्टेबल किरण निंबाळकर श्रावण राठोड अमीत गोळे प्रसाद दुदुस्कर या टिमची दि.२७ रोजी  बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करुन वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांन मधील अज्ञात चोरट्यांच्या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते .
        वरील डिबी पथकातील पोलिस कर्मचारी हे दि.२८ रोजी सकाळी वाई शहरातील विविध भागात छापेमारी करत असतानाच पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना त्यांच्या खास खबर्या मार्फत माहिती मिळाली कि वाई शहरात दोन तरुण मुले काळे रंगाचे नंबर नसलेल्या मोपेड दुचाकी वरुन संशयीतरित्या फिरत आहेत हि माहिती तातडीने डिबी पथकाला भरणे यांनी दिली .माहिती प्राप्त होताच पथकातील पोलिस कर्मचारी वर्गाने वरील दोघांचा शोध घेण्यासाठी वाई शहर पिंजून काढले त्या वेळी या पथकाने सोनगीरवाडी येथे सापळा लावुन बसले असता या लावलेल्या सापळ्यात हवे असलेले दोन चोरटे अडकले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे प्रतीक लक्ष्मण भोसले वय १९ राहणार शिरगाव ता.वाई आणी हेमंत किशोर कदम वय १९ राहणार खेड नांदगीरी ता.कोरेगाव अशी सांगितली . त्यांनी एक महिन्याच्या कालावधीत महाबळेश्वर येथुन १ बुलेट व १ हिरो होंडा मोटर सायकल तसेच वाई शहरातुन 
४ हिरो होंडा मोटर सायकल अशा सुमारे ३ लाख रुपये किमतीच्या ६ मोटरसायकल चोरल्या असल्याची कबुली दिली .
             त्या पैकी काही मोटरसायकली दडवून ठेवल्या 
होत्या तर काही मोटरसायकली विकल्या असल्याचे तपास उघड झाले .विकलेल्या आणी लपवून ठेवलेल्या मोटरसायकली डीबी पथकाने ताब्यात घेतल्या आहेत . वरील दोन्ही आरोपींन वर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .याचा अधिक तपास महिला पोलिस नाईक सोनाली माने या करीत आहेत
To Top