शिरोळ ! प्रतिनिधी चंद्रकांत भाट ! पंचायत समितीच्या १६ मतदार संघातील आरक्षण सोडत जाहीर

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : प्रतिनिधी
 शिरोळ पंचायत समितीच्या 16 मतदारसंघातील आरक्षण सोडत गुरुवारी  काढण्यात आली, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके   यांच्या अध्यक्षतेखाली  शिरोळ तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यालय येथे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली, तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून आरक्षण सोडत याबाबत माहिती दिली,
       शिरोळ तालुका पंचायत समितीमध्ये  16
गण आरक्षणापैकी झालेली सोडत प्रक्रिया अशी-
या आरक्षण सोडतीमध्ये कोथळी ,अर्जुनवाड, शिरढोण ,नांदणी, चिपरी ,यड्राव हे मतदार संघ सर्वसाधारण गटासाठी तर धरणगुत्ती, तेरवाड, हेरवाड आणि दतवाड हे मतदारसंघ सर्वसाधारण महिलाकरिता आरक्षित झाले आहेत, या आरक्षण सोडतीमध्ये काही पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांना फटका बसला आहे, त्यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती तालुक्यात झाली आहे,
        शिरोळ तहसील कार्यालयातील सभागृहात तहसीलदार डॉ अपर्णा मोरे -धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली शिरोळ पंचायत समितीच्या मतदारसंघाचे आरक्षण सोडत काढण्यात आली, मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी पंचायत समितीचे पदाधिकारी यासह  इच्छुक उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते, यामुळे या आरक्षण सोडतिला गर्दी झाली नाही,
     तालुक्यातील लोकसंख्येचा आधार घेत आणि आणि सन 2002 पासून लागू झालेले आरक्षण व अनुसूचित जातीची लोकसंख्या ग्राह्य धरून प्रथम अनुसूचित जाती यासाठी मतदारसंघ आरक्षित करण्यात आले, त्यानंतर अनुसूचित जाती महिला याकरिता आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले, या आरक्षणानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले, 
     नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता आरक्षण झाल्यानंतर सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला याकरिता मतदार संघाचे आरक्षण घोषित करण्यात आले,
          शिरोळ पंचायत समितीचे मतदारसंघ निहाय आरक्षण पुढील प्रमाणे ---  
दानोळी- नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोथळी- सर्वसाधारण 
उदगाव - अनुसूचित जाती महिला 
अर्जुनवाड-  सर्वसाधारण
 गणेशवाडी -अनुसूचित जाती महिला 
आलास-  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला धरणगुत्ती- सर्वसाधारण महिला
 नांदणी -अनुसूचित जाती 
चिपरी-  सर्वसाधारण 
यड्राव - सर्वसाधारण
 अब्दुललाट -नागरिकांचा मागास प्रवर्ग शिरढोण -सर्वसाधारण 
अकिवाट -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तेरवाड- सर्वसाधारण महिला
 हेरवाड-  सर्वसाधारण महिला
 दत्तवाड- सर्वसाधारण महिला
            तालुक्यातील पंचायत समितीचे झालेले आरक्षण पाहता शिरोळ पंचायत समितीचे तत्कालीन सभापती व पंचायत समितीचे सदस्य
 मल्लाप्पा चौगुले, सौ  मीनाक्षी कुरडे, दिपाली परीट, रूपाली मगदूम ,मिनाज जमादार यांना आरक्षणाचा फटका बसला, तत्कालीन  उपसभापती राजगोंडा पाटील, सचिन शिंदे, मन्सूर मुलांनी, संजय माने  यांना या आरक्षणाचाही तोटा सहन करावा लागणार आहे , तर सौ अर्चना चौगुले, सौ कविता चौगुले व मल्लू खोत यांना सोडत झालेल्या आरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही,
       पंचायत समिती सदस्यांना विकास कामे करताना म्हणावा तसा निधी मिळत नाही हे पद फक्त प्रतिष्ठेसाठी असल्याचे पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या असणाऱ्या भावना आणि निधीची मागणी करूनही शासनाकडून निधी मिळत नाही त्यामुळे आज आरक्षण सोडतिला अनेक मातब्बराणी पाठ फिरवली
To Top