सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षण वरील स्थगिति उठविल्या नंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आरक्षण सोडती आज झाल्या यामधे सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात जिल्हा परिषदेचे म्हसवे,कुडाळ आणि कुसुंबी हे तीन गट येतात यापैकी म्हसवे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला तसेच कुडाळ जिल्हा परिषद गटात ओबीसी पुरूष व कुसुंबी गटात ओबीसी महिला आरक्षण पडल्याने तीन पैकी दोन गटात ओबीसी ना संधी चालून आली आहे
तसेच जावली पंचायत समितीच्या सहा गणाचे आरक्षण सोडती आज संपन्न झाल्या यामधे सायगाव गण सर्वसाधारण पुरुष,कुडाळ गण सर्वसाधारण महिला,म्हसवे गण सर्वसाधारण महिला,खर्शी बारामुरे गणात सर्वसाधारण महिला,तसेच कुसुंबी गणात सर्वसाधारण महिला व आंबेघर तर्फ मेढा मधे सर्वसाधारण पुरुष या आरक्षण सोडती मुळे गटात आणि गणात कही खुशी कही गम अशी राजकीय नेते मंडळीची स्थिती झाली असून आता नवीन चेहरे जावली च्या राजकीय पटलावर दिसण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधनी करण्यात येणाऱ्या काळात व्यस्त राहणार असून येणारा गणेशोत्सव प्रचारा करीता सर्वाना व्यासपीठ म्हणून मिळणार आहे त्यामुळे गणपती बाप्पा कोणाला पावतो हेच आता पहावे लागेल