सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल रात्री दि २७ रोजी ९.३० वा कार्तिक चा झी मराठीवर डान्स शो झाला. यामध्ये अभिनेते संदीप पाठव व वैभव मांगले हे सूत्रसंचालन करतात तर सोनली कुलकर्णी आणि ग्रीष्मीस महाजन हे परीक्षक म्हणून काम करतात. कार्तिक चा डान्स झाल्यानंतर परीक्षक कार्तिक ला काही प्रश्न विचारतात. यावर कार्तिक सांगतो. गावाकडे जमीन नसल्याने आम्हाला ऊस तोडल्याशिवाय पर्याय नाही. एकदा
सोमेश्वर कारखान्यावर ऊसाची वाहतूक करताना आमची गाडी पलटी होती. त्यावेळी आई आणि बापूने उडी मारली नसती तर ते मरले पण असते. यावेळी कार्तिक आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देतो. यावेळी अभिनेते संदीप पाठक त्याला धीर देतो सांगतो. बाळा हा रंगमंचच ग्रामीण भागातील मुलांसाठी आहे. मी सुद्धा एकेकाळी माझलगाव वरून स्लीपरवर आलो होतो.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरील सद्या एका झोपडी राहणार अकरा वर्षाचा कार्तिक गौतम लोखंडे हा झी मराठी वरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' या डान्स शोच्या फायनलच्या टॉप बारा मध्ये पोहचला आहे. परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काल दि २७ रोजी तो झी मराठी चॅनलवरील डान्स महाराष्ट्र डान्स कार्यक्रमात झळकला. फक्त झळकलाच नव्हे तर त्याने फायनल च्या टॉप १२ मध्ये देखील प्रवेश मिळवला आहे. कार्तिक चे वडील गौतम लोखंडे हे मूळ डोंगरगण जि. बीड येथील असून गेल्या वीस वर्षापासून बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्यावर ऊस तोडण्याचे काम करतात. सहा महिने ऊस तोडीचे काम केल्यावर उर्वरित सहा महिने इथेच राहून पडेल ते काम करतात. कार्तिक सद्या सोमेश्वर विद्यालयात ७ वी मध्ये शिकत आहे. सोमेश्वरनगर परिसरातील डान्स अकॅडमीचे प्रशिक्षक योगेश ननवरे यांनी चार वर्षापूर्वी ऊसतोडणी कामगारांच्या झोपडीवर डान्स करणारा हा हिरा अचूक ओळखला. आणि हे प्रशिक्षण कार्तिक च्या आई वडिलांकडे गेले. सुरुवातीला त्यांनी नकार दिला. मात्र नंतर त्यांच्या होकारानंतर गेली चार वर्ष प्रशिक्षण योगेश ननवरे यांनी या हिऱ्याला पैलू पाडत घडवले.
सोमेश्वर कारखान्यावर ऊस तोडण्याचे काम करणाऱ्या ऊसतोडणी कामगारांचा मुलगा झी मराठीच्या मंच्यावर पोहोचल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
---------------------------
त्याला पाच वर्षे चालता येत नव्हते------
कार्तिक लहानपणापासून सोमेश्वर कारखण्यावरील ऊस तोड कामगारांच्या झोपडीत लहानाचा मोठा झाला. जन्मानंतर त्याने तीन महिने डोळे उघडले नाहीत. तीन वर्षे त्याला बोलता देखील येत नव्हते तर तो पाच वर्षे चालला नाही. आज देखील त्याला सर्व मुक्या या नावानेच हाक मारतात. पण पाच वर्षे जो मुलगा चालला नाही त्याचे पाय झी मराठीवर चालतील हे आई वडिलांना देखील माहीत नव्हतं.