सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन व ज्युबिलंट इंग्रेव्हिआ लि.तर्फे आसपासच्या १५ गावातील शेतकऱ्यांसाठी तब्बल २२ हजार फळ झाडांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये आंबा, नारळ, चिकु, लिंबु अशा प्रकारच्या रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ज्युबिलंट इंग्रेव्हिआ लि.चे उपाध्यक्ष सतीश भट यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रोडक्शन हेड सुब्रमण्यम भट, इंजिनिअरींग हेड राजेंद्र राघव, बायोकंपोस्ट हेड मधुकर घोगरे, ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशनचे सीएसआर प्रमुख अजय ढगे, सिक्युरिटी हेड सत्येंद्र कुमार, व इतर विभागप्रमुख उपस्थित होते, अशी माहिती ज्युबिलंट इंग्रेव्हिआ लि.चे जनसंपर्क व्यवस्थापक इसाक मुजावर यांनी दिली. याबरोबरच या कार्यक्रमाला आसपासच्या गावातील सरपंच व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.
पर्यावरणाचा समतोल राखणे, तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी फळ झाडाचे उत्पादन वाढवणे या हेतूने हा झाडे वाटपाचा उपक्रम गेली अनेक वर्षे ज्युबिलंट तर्फे राबविला जातो. पर्यावरण व लोकांच्या विकास कामासाठी ज्युबिलंट भारतीय फाउंडेशन सतत वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.