भोर ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! पंचायत समिती जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद आरक्षण सोडत गुरुवार दि.२८ जाहीर झाली असून गन उञौली-सर्वसाधारण महिला,कारी-सर्वसाधारण महिला,भोलावडे ओबीसी महिला,शिंद-सर्वसाधारण पुरूष,भोंगवली,सर्वसाधारण पुरूष,संगमनेर-सर्वसाधारण महिला,नसरापूर-सर्वसारण पूरूष तर वेळू गनातही सर्वसाधारण पुरूष आला आहे.तर जिल्हा परिषद गट कारी - उत्रोली, भोंगवलि - संगमनेर  व भोलावडे - शिंद येथे ओपन तर वेळू - नसरापूरला ओबीसी आरक्षण जाहीर झाले आहे.
   पंचायत समिती आरक्षण सोडतिचा कार्यक्रम भोर येथील अभिजीत मंगल कार्यालय येथे पार पडला तर जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत पुणे येथे जाहीर करण्यात आली.पंचायत समिती आरक्षण सोडती विषयी हरकती व सूचना कोणाच्या असतील तर २९ जुलै ते २ ऑगस्ट पर्यंत तहसील कार्यालय भोर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे देण्याच्या सूचना तहसीलदार सचिन पाटील यांनी केल्या.यावेळी प्रांताधिकारी तथा नियंत्रण अधिकारी राजेंद्र कचरे ,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे ,नायब तहसीलदार मनोहर पाटील तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top