सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजे येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे श्रावण महिन्यात पार पडणाऱ्या यात्रेसंदर्भात बुधवारी (दि.२७) रोजी आयोजित केलेल्या बैठकीत कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंदीर परीसरातील गाळ्यांचा वादही मिटवण्यात आला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांच्या ताब्यात गाळे आहेत त्या संबंधित व्यापारी व पुजारी यांनी दुसरीकडे जागा धरून दुकान टाकू नये, गाळ्यांच्या व्यतिरिक्त मंदीर परीसरात दुकान लावण्यास बंदी राहील, बाहेरील व्यवसायिकांसाठी कमिटीने जागा वाटप करावे, कोणावर अन्याय न होता कोणत्याही वादाशिवाय यात्रा पार पाडावी, तसेच परीसरातील पाच गावचे सरपंच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहतील आदी निर्णय घेण्यात आले.याशिवाय मंदीरासमोरील दुकानेही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय नेमलेली कमिटी यात्रा नियोजन ही पार पाडणार आहे. मंदीरातील पुजाऱ्यांच्या दोन गटात नुकत्याच झालेल्या वादामुळे संबंधित बैठक बोलावण्यात आली होती.
देवस्थान ट्रस्ट बद्दल काही तक्रारी असतील तर त्याबाबतीत धर्मदाय कार्यालयाकडे अर्ज करावेत अशा सूचनाही प्रांताधिकाऱ्यांनी यावेळी केली. कायदा व सुव्यवस्था राखावी, स्वच्छता राखावी.तसेच यात्रा काळात कोणी वाद विवाद घालण्याचा प्रयत्न केला.तर दोन्ही गटातील संबंधित व्यक्तींवर कलम १४४ खाली दोन महीने तडीपार करण्यात येईल. इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे अधिकारी सोमनाथ लांडे, तलाठी आगम, करंज्याच्या सरपंच जया गायकवाड, करंजेपुलचे सरपंच वैभव गायकवाड, देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर, सर्व विश्वस्त, तसेच चौधरवाडी, करंजे, सोरटेवाडी, मगरवाडी, करंजेपुल, सोमेश्वरनगर परीसरातील ग्रामस्थ, यांच्यासह बाळासाहेब गायकवाड आणि शिवाजी शेंडकर उपस्थित होते.