खंडाळा ! 'गाव तिथं शाखा, आणि घर तिथं शिवसैनिक'....! मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सभासद नोंदणी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री  उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  गाव तीथे शाखा घर तीथे शिवसैनिक म्हणून सभासद नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला. 
    दि २७ रोजी शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.नितिन बानुगडे-पाटील,जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख अजित यादव,शिव उद्योग सहकार सेना जिल्हाध्यक्ष सचिन भाऊसाहेब चव्हाण तालुकाप्रमुख आदेश जमदाडे,शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतुक सेना वाई विधान सभा संघटक  याच्या नेतृत्त्वाखालील शिरवळ शहर प्रमुख विजय गिरे माजी तालुकाप्रमुख संपतराव मगर यांनी शिवसेना सभासद नोंदणी कार्यक्रम घेतला तसेच भादे जिल्हा परिषद गट नायगाव गण या गणातून पण मोठ्या संख्येने शिवसेना सभासद नोंदणी करण्यात आली तसेच पदाधिकाऱ्यांकडून शंभर रूपयांच्या बोडवर प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात आली मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने गावागावातील शिवसैनिक, ग्रामस्थ यांनी सभासद नोंदणी केली आज खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम आहे व आमचा पाठिंबा जाहीर करण्यात आला हा उत्साह पाहता शिंदे गठाला ज्यांनी पाठींबा दिला होता त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे व शिवसैनिक व ग्रामस्थ यांनी दाखवून दिले की आखा खंडाळा तालुका पक्षप्रमुख याच्या पाठीमागे आहे आज खऱ्या अर्थाने पक्ष प्रमुख यांना वाढदिवसानिमित्त सभासद नोंदणी करून वाढदिवसानिमित्त भेट दिली गेली दोन महिने नवीन सरकारचा जो काही हा खेळ चालाय त्याची गंभीर दखल घेत सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून मोठ्या उत्साहात सभासद नोंदणी करत आहेत जे हे नवीन सरकार स्थापन झाल्या पासून त्या सरकारला शेतकर्‍यांच काहीच पडले नाही व जनतेचे पण काहीच पडले नाही हे सरकार फक्त आपलीच घरे भरत आहेत असा सूर उमटू लागला ज्या ज्या गावात सभासद नोंदणी करत असताना तीथले शिवसैनिक व ग्रामस्थ विचारतोय की हे फाॅरम पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचेच असतील तर आम्ही जरूर भरणार आणी आमची ताकद दाखवून देणार या नवीन सरकारला तसेच शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतुक सेना शिरवळ शाखेच्या पण सर्व शिवसैनिकनी सभासद नोंदणी करून पाठिबा जाहिर केला त्या वेळी प्रमुख उपस्थिती 
उपजिल्हाप्रमुख अजित यादव, तालुकाप्रमुख आदेश जमदाडे, माजी तालुकाप्रमुख संपतराव मगर, शिव उद्योग सहकार सेना सातारा जिल्हाध्यक्ष सचिन भाऊसाहेब चव्हाण, विभाग प्रमुख सागर कदम, उपविभाग प्रमुख अंनत रामचंद्र चव्हाण, उपतालुकाप्रमुख गणेश जाधव, शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतुक सेना वाई विधान सभा संघटक रियाज कासमभाई शेख,खंडाळा तालुका सचिव महेंद्र भोसले,खंडाळा शहर प्रमुख गोविंद गोपाळराव गाढवे, शिरवळ शहरप्रमुख विजय गिरे व सर्व शिरवळमधील शिवसैनिक, भादे जिल्हा परिषद गटातील व नायगाव गणातील शिवसैनिक उपस्थित होते
To Top