सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई दौलतराव पिसाळ
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील मांढरेवाडीतील डोंगरात बिबट्याने मेंढ्या वर हल्ला करुन त्याला ठार केल्याने भितीचे वातावरण तयार झाल्याने गुरे चारणाऱ्यांमध्ये येथे वावरत असणाऱ्या बिबट्याची दहशत मना मनात बसल्याने या वावरत असणार्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांन मधुन होत आहे .
सविस्तर वृत्त असे कि गाडवेवाडी ता .वाई ग्रामपंचायत अंतर्गत असणारी मांढरेवाडीतील रहिवासी असलेल्या सौ.सरिता नामदेव चिकणे वय ४० या दि .७ रोजी गावातील चिमटा परिसरातील डोंगर परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक पाळीव मेंढा आणी गाई एक बारीक वासरू अशी जनावरे घेऊन त्या चारण्या साठी नेहमी प्रमाणे सोडुन आल्या होत्या पण आधी पासूनच दबा धरून बसलेल्या
बिबट्याने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने जनावरांच्या मागे कोणी नसल्याचे पाहुन थेट मेंढ्यावर हल्ला चढवला त्यात मेंढा गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला .हे दृश्य गाईने पाहिले अन ति घाबरुन हंबरडा फोडत होती पण कोणीही मदती साठी येत नसल्याचे पाहुन गाईने बछड्यासह घर गाठले त्या वेळी मालकीण सौ.सरिता ह्या गाई वासरु दारात ऊभी पाहुन त्यांना आश्चार्याचा धक्काच बसला पण सोबत मेंढा नसल्याने त्याही आवाक झाल्या त्यांनी मेंढा घरी आले नसल्याने याची माहिती त्यांनी मुलगा प्रथमेश यास सांगितली तोही काळजीत पडला लहान मुला प्रमाणे घरा दारात वावरणारा मेंढा परत घराकडे न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी त्याने आपले मित्र राहुल भिलारे संदेश भिलारे प्रतीक मांढरे प्रकाश भिलारे राजेंद्र नलवडे यांना सोबत घेऊन चिमटा परिसरातील डोंगरात भर पावसात गेले असता त्यांना परिसरात बिबट्याच्या पंजांचे ठसे आढळून आल्यामुळे आपला मेंढा बिबट्याने पळवला अशी शंका आल्याने या तरुणांनी डोंगर परिसरात जंगलातील आतील भागात जाऊन पाहिले असता मेंढा अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मृत झालेल्या अवस्थेत सापडल्याने हे तरुण देखील भयभीत होऊन पुन्हा घराकडे परतले .पण घरा दारात लहान मुला सारखा खेळणारा बागडणारा मेंढ्याचा अशा प्रकारे झालेल्या मृत्यूने सौ.सरिता आणी त्यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण लहान मुला प्रमाणे प्रत्येक शेतकरी हा जनावरे मोठी करत असतो जो पाळतो त्यालाच त्याचे दुःख समजते .येथील नागरीकांनी वनविभागाने बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे .