सोमेश्वर रिपोर्टर टीम--- --
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी
विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींला २० ते २५ देशी झाडे देण्याचा संकल्प केला आहे.
देशी झाडं ही पर्यावरणासाठी अधिक प्रमाणावर उपयुक्त ठरतात याचा विचार लक्ष्यात घेता दादांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून हा पर्यावरण पूरक उपक्रम राबवला जाणार असल्याचे ऋषीकेश गायकवाड यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून बहावा, शिवण,रतनगुंज,पिंपळ, आपटा,भेहडा, पुत्रंजीवा, तामण, जांभूळ,सावर आशा अनेक प्रकारची देशी झाडे उपलब्ध करून दिली जाणार आहेत या झाडांची पूर्ण निगा राखण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची असेल. गायकवाड हे स्वःता ही झाडे ग्रामपंचायतीना पोहचवणार आहेत.