वाई ! ब्रिटीशकालीन कृष्णा नदीवरील पुलाचं रुपडं पालटलं : वाईकारांच्या जिव्हाळ्याचा पुल वाहतुकीसाठी खुला

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाईकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला व वाहतूकदृष्टंया महत्वपुर्ण असलेला नवीन मोठा पुल आज वाहतुकीसाठी खुला करताना वचणपुर्तीचा आनंद होत आहे. अवघ्या पाच महिण्यांच्या कालावधीत हा ८० मिटर लांब व १२ मिटर रुंद पाच अार्च असलेला पुल पुर्णत्वास नेला आहे. सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यापुर्वी या पुलाचे लोकार्पण होत आहे, असे उदगार आमदार मकरंद पाटिल यांनी काढले. 
   येथील ब्रिटिशकालीन जुणा कृष्णा पुलाची आयुर्मयादा संपल्याने तो पाडूण त्या ठिकाणी नविन पुलाची उभारणी करण्यात आली. यापुलाच्या उद्घाटण आ. मकरंद पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
    यावेळी प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ, अनिल सावंत, संजय लोळे, प्रदिप चोरगे, चरण गायकवाड, राजेश गुरव, भारत खामकर, प्रदिप जायगुडे, भैया डोंगरे, मदन भोसले, अँड. श्रीकांत चव्हाण, भुषण गायकवाड, बाळासाहेब चिरगुटे, अशोक सरकाळे, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, सपोनी शिर्के, कृष्णाराज पवार आदिंसह कार्तकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले तसेच आ. पाटिल यांनी फित कापूण पुलाचे उद्घाटण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पाटिल यांनी गाडीतून पूल पार केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करूण कार्यकर्त्यांनी पाटिल यांच्या नावाचा जयघोष केला.
    सर्वत्र पावसाणे जोरदार हजेरी लावली असून वाहतुकीच्या दृष्टिने या पुलाचे पावसाळ्यापुर्वी उद्घाटण करण्यात आले आहे. पुलाचे संरक्षक कठडे व सुशोभीकरणाचे काम पावसाळा संपल्यानंतर सुरु करण्यात येणार आहे. लोकांच्या मागणीनुसार हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात अाला असल्याचेही आ. पाटिल यांनी यावेळी नमुद केले.
To Top