भोर ! नेरे जि.प.शाळेत आषाढी वारीनिमित्त चिमुकल्यांचा विठूनामाचा जयघोष

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
 भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील वीसगाव खोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरे ता. भोर च्या चिमुकल्या बालचमू वारकऱ्यांनी विठ्ठल- रुक्मिणी, ज्ञानोबा ,तुकोबा ,गोरोबा ,एकनाथ ,जनाबाई मीराबाई आदी संतांची वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगच्या निनादत ज्ञानोबा माऊली तुकाराम,माउली-माउली तसेच विठूनामाचा जयघोष करीत परिसर दुमदुमून सोडला.
       आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शाळेतील शेकडो चिमुकल्यांनी हरी नामाचा गजर करत विठुरायाच्या भक्तिरसात हातात पताका घेऊन सवाद्य पालखीची मिरवणूक काढली होती. चिमुकल्यांनी पालखीची आकर्षक सजावट करण्यात केली होती.यावेळी गावातील ग्रामस्थ ,भाविक-भक्तांनी चिमुकल्यांनी काढलेल्या माऊलींच्या पालखीचे स्वागत करीत दर्शन घेतले.तर पालखी मिरवणुकीमध्ये महिला पालकांनी फुगड्या खेळून वारीचा आनंद लुटला.यावेळी जेष्ठ ह.भ. प.गोपाळ सावले,मधुकर बढे,ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई मांढरे,अनिता शेलार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष म्हस्के, मुख्याध्यापक जयश्री घोडके,उपशिक्षक हरिप्रसाद सवणे, रेश्मा म्हस्के,राजश्री चिकने आदींसह पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top