बारामती ! बगलबच्चे व ठेकेदार जगवण्यासाठी हुकूमशाही पद्धतीने बारामतीच्या तथाकथित विकासाचा बागूलबुवा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
नियोजनशुन्य, अकल्पक विकास आराखडे तसेच जनतेच्या पैशाचा अपव्यय करून केवळ बगलबच्चे व ठेकेदार जगवण्यासाठी हुकूमशाही पद्धतीने पवारांकडून बारामतीच्या तथाकथित विकासाचा बागूलबुवा उभा करून कायमच जनतेला भ्रमीत करण्याचं पाप केले असल्याचा आरोप पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे मा. उपाध्यक्ष तथा जिल्हा सहसंयोजक ॲड. नितीन भामे यांनी केला आहे. 
                   ॲड. नितीन भामे पुढे म्हणाले, बारामतीचा भरकटलेला विकास रुळावर आणण्यासाठी शिंदे सरकारने स्थगितीच्या निर्णयाचे स्वागतच करत असल्याचे सांगत आता ह्या प्रकारे भरकटलेल्या विकास माथी मारण्याचे काम बारामतीची जनता सहन करणार नाही, याचा जाब पवारांना द्यावाच लागेल. जनतेच्या हिताच्या आवश्यक कामांवर परिणाम होणार नाही याची काळजी शिंदे सरकार घेईलच
बारामतीतील विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत नविन पालक मंत्री नियुक्त झाल्यानंतर पक्ष पातळीवर तक्रार केली जाईल तसेच ज्या ठिकाणी जनतेच्या हिताची विकास कामे आवश्यक आहेत तिथे निश्चितच काम सुरू करण्याबाबत विनंती केली जाईल.
       परंतु ठेकेदार व बगलबच्च्यांच्या आट्टाहासाने जनतेच्या माथी मारले गेलेले प्रकल्प बाबत निश्चितच विरोध केला जाईल. होय केवळ ठेकेदार व बगलबच्च्यांचाच फायद, कारण सर्व सामान्य जनतेला त्या कामाचं काहीच कौतुक नाही. अपुर्ण पाणी पुरवठा योजना, शहरातील स्वच्छतेचा कायमचाच प्रश्न, कचरा डेपो प्रश्न, अंतर्गत रस्त्यांची कायमच डागडूजी करावी लागणे, विकास कामांबाबत ढिसाळ नियोजन, पुर्वनियोजनाचा आभाव, झालेली विकास कामे पुन्हा तोडण्याचा निर्णय असे अनेक अविचारी निर्णय मागील अडीच वर्षाच्या काळात झालेत परंतु केवळ पाशवी बहुमतीच्या जोरावर बारामतीत जनतेची मुस्काटदाबी करून घेतेलेले निर्णय जनतेला मान्य नाहीत.
To Top