बारामती ! राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या बाल वैज्ञानिकांचे घवघवीत यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन टेक्नोथॉन २०२२ यामध्ये विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सीबीएसई यांनी प्रोडक्शन ऑफ नॅचरल एनपीके या प्रकल्पाचे सादरीकरण केले या प्रकल्पासाठी इयत्ता सहावी , सातवी , आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अतिशय कमी खर्चामध्ये व सेंद्रिय शेतीला पोषक अशा खतांची निर्मिती कशी करायची हा या प्रयोगाचा मुख्य उद्देश होता. 
        सदर प्रयोगाला माध्यमिक गटातून तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. ८००१ रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. सदर प्रकल्पात सहभागी विद्यार्थी वैभवी फरांदे , वेदांत भोसले , राजलक्ष्मी जगताप व आदित्य पंडित हे होते. 
          सदर प्रकल्पाची संकल्पना व मार्गदर्शन शाळेतील जीवशास्त्र विभागातील दीपिका वीरकर यांनी केले. शाळेच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक.सचिन पाठक यांनी केले.
To Top