विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्रजी पवार ग्रुप ऑफ इन्टिटयुट मार्फत राज्याचे विरोधी पक्षनेते  अजित पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील विज्ञान, शेती, अभियांत्रिकी, शास्त्र या क्षेत्रातील माहिती अद्यायवत व्हावी या उद्देशाने भव्य राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शन तसेच  राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्प स्पर्धा २१ व २२ जुलै रोजी आयोजित केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी दिली. 
           हे प्रदर्शन प्रथमच होणार असून पुढील काळातही दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय प्रदर्शन व स्पर्धा शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट सोमेश्वरनगर येथे पार पडणार असून राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते बारावी आणि तांत्रिक महाविद्यालयातील सर्व विभागाचे विद्यार्थी सहभागी होणार असून यासाठी तीन लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र संस्थेमार्फत दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या प्रदर्शनात  सहभागी होण्यासाठी राज्यभरातून नांदेड, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, पुणे या जिल्हयातील सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामध्ये शालेय विभागातून २२९ प्रकल्पाची नोंदणी झालेली असून ४८८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत तर महाविद्यालयीन गटातील १५८ प्रकल्पाची नोंदणी झालेली असून ४९५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ग्रामिण भागात राज्यपातळीवर पहिल्यांदाच असे भव्य विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा पार पडणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवण्याचे अवाहन संस्थेचे सचिव भारत खोमणे, मुख्य समन्वयक डॉ. संजय देवकर, समन्वयक प्रा. सोमनाथ हजारे, डॉ. अमोद मरकळे व डॉ. रामचंद्र पवार यांनी केले आहे.
To Top