सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यातील गावा गावांन मध्ये सर्दी खोकला आणी ताप या साथीच्या आजारांनी थैमान घातल्याने एका घरा घरांतील किमान दोन तीन सदस्य लहाना पासुन मोठ्यान पर्यंत सर्व जन या साथीचे शिकार झाल्याने वाईच्या ग्रामीण रग्णालयासह तालुक्यातील प्राथमीक आरोग्य केंद्र आणी खाजगी दवाखाने दिवसे दिवस वाढत्या रुग्ण संख्येने हॉऊसफुल झाल्याचे चित्र सध्या पहाव्यास मिळत आहे औषधे ऊपचारा मिळवण्या साठी तासंनतास रांगेत रुग्णांना ऊभे रहावे लागत आहे . वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दररोज ४०० ते ४५० रुग्ण रक्त लघवीसह आजार कशा मुळे ऊभवला आहे अशा सर्व प्रकारच्या आवश्यक शास्वत तपासण्या करुन त्यांचे रिपोर्ट पाहूनच औषधे देण्याचे काम केले जाते रुग्ण लवकर बरा झाला पाहिजे हा मुख्य हेतु डोळ्या समोर ठेवूनच आम्ही सर्व डॉक्टर्स परिचारिका सर्व विभागांचे कर्मचारी कामकाज जबाबदारीची जाणीव ठेवून करत असतो अशी माहीती वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण तपासणी चेंबर मध्ये ऊपस्थित असलेल्या महिला डॉक्टर्स सुजाता बचुटे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे .
डॉक्टर बचुटे सोमेश्वर रिपोर्टर प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या गेल्या आठ ते दहा दिवसा पासून वाई तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु होता त्याच दरम्यान हवामानात बदल झाल्या मुळे सर्दी खोकला आणी ताप या साथीच्या आजारांची एक प्रकारची लाट आल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली त्या मुळे वाई तालुक्यातील गावा गावांन मधील घरा घरांन मध्ये या साथीने शिरकाव केल्याने लहाना पासुन मोठ्यांन पर्यंत या साथीचे शिकार झाल्याने याचा परिणाम म्हणून रुग्ण संख्येत दररोज झपाट्याने वाढ होताना दिसत आहे अशा सर्व रुग्णांनी शास्वत औषधे ऊपचारा घेण्यासाठी पहीली पसंती वाईच्या ग्रामीण रुग्णालयाला दिली असल्याने वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दररोज ४०० ते ५०० रुग्णांची सर्व प्रकारांच्या चाचण्या करुन तपासणी करून या रोगांनवर मात करण्या साठी खात्रीशीर औषधे दिली जातात ज्या मुळे रुग्ण लवकर बरा होण्यासाठी मदत होईल हिच भावना वाईच्या ग्रामीण रुग्णालयाची आहे पण सध्या वाईच्या ग्रामीण रुग्णालयात या आजाराच्या रुग्ण संख्येमुळे सकाळ पासूनच खचाखच भरलेले असते.
त्यामुळे रुग्णालयावर सध्या रुग्ण तपासणीचा भार वाढलेला आहे .या सर्व रुग्णांना रुग्णलयात असलेल्या औषध कक्षात कार्यरत असलेले औषध निर्माण अधिकारी आफताब पटेल हे रुग्णास औषधे देत असताना औषधे घेण्याची पध्दती व्यवस्थीत समजावुन सांगत असतात .वाईच्या ग्रामीण रुग्णालयात मोफत मिळणार्या औषधे ऊपचारा वर वाई तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास असल्याचे दररोज होणार्या रुग्ण संख्येच्या गर्दीने सिद्ध होत असल्याने हिच आंम्हा सर्व डॉक्टर्स परिचारिका सर्व कर्मचारी वर्गाची पावती आहे . रुग्णसेवा हिच इश्वर सेवा मानुन आम्ही सर्वजन
२४ तास वाईच्या ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असतो असे ऊदगारही डॉक्टर सुजाता बचुटे यांनी सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना काढले .