'त्या' ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ! चौधरवाडी येथील रस्ते अपघात प्रकरण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा-मोरगाव रस्ता बांधकामासाठी खोदलेल्या खड्यांत पडून सुनिल साहेबराव भोर यांचा म्रूत्यु हा ठेकेदार यांच्या बेफिकरीमुळे व बेजबाबदारीमुळे झाला असून सदर कामात केलेल्या हयगयीमुळे, बेजबाबदारपणेमुळे एका निष्णाप व्यक्तीस आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे मृत व्यक्तीचे कुटूंब उघडयावर आले आहे अशा ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिवसेना पश्चिम विभागप्रमुख राकेश उर्फ बंटी गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात याबाबत निवेदन दिले आहे. याठिकाणी अजूनही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
          ३ जुलै रोजी नीरा-मोरगाव रस्ता बांधकाम संदर्भात रस्त्याच्या मधोमध पुल बांधण्यासाठी केलेल्या खड्यात पडून सुनिल  भोर रा. खडकवाडी, भोरवाडी जि. अहमदनगर या व्यक्तीचा या खोदकाम केलेल्या खड्यात पडून मृत्यु झाला. खोदकाम केलेल्या खड्यांच्या दोन्ही बाजूला लोखडी बॅरेकेट लावले असते तर अपघात झाला नसता किंवा धोकादायक असा माहिती फलक ही लावलेला नाही. 
         एका निष्पाप व्यक्तीच्या म्रुत्युची जबाबदारी निश्चित करून ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. 
To Top