कागदातून नोटांचा पाऊस......! तर मुलाला तीन तलवारीवर अधांतरी... शिवम जादूगाराचा जादू पाहून सह्याद्री पब्लिक स्कुल मधील मुले अचंबित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा हेतूने एस. डी सह्याद्री पब्लिक स्कूल मध्ये ४ जुलै रोजी महेंद्र सदाशिव माने इंटरनॅशनल शिवम जादूगर राहणार वडगाव निंबाळकर यांच्या जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते.
           कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाची आरती करून ती जादूच्याच माध्यमातून करण्यात आली. शिवम जादूगार यांनी आपल्या जादूच्या कलेच्या जोरावर तीन तास मुलांना खिळवून ठेवले होते. वेगवेगळ्या प्रकारचे जादूचे प्रयोग दाखवून त्यांनी मुलांना मग्न करून ठेवले होते.  हे शिवम जादूगार आपल्या जादूच्या कलेच्या मनोरंजनाच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये समाज प्रबोधनाचे कार्य करतात . त्यांच्या या कलेमुळे त्यांना शेकडो मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला
          कार्यक्रमाच्या वेळी वेळी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत ,सह्याद्री पब्लिक स्कूलचे प्राचार्य अजित वाघमारे, ,सर्व शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते  कार्यक्रमाचे प्रास्तविक गौरी फरांदे यांनी केले
To Top