अजित दादांच्या सूचना.....! आणि तहलेल्या सुपेकरांसाठी जानाईतून पाणी ! मात्र पैसे भरणाऱ्या लाभार्थ्यांनाच मिळणार पाणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कामाची शैली सर्वांना ज्ञात आहे. सद्या बारामती तालुक्यातील सुपे परगण्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जळू लागली आहेत. याबाबत काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधून दादांना याची कल्पना दिली. अजित दादांनी देखील तातडीने याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना जानाई योजनेतून पाणी सोडण्याच्या सूचना केल्या. 
          पाऊसाने ओढ दिल्यामुळे सुपे आणि सुपे परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली होती ही बाब लक्षात घेऊन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे तसेच बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर संपर्क करून जानाई योजना सुरू करण्याची मागणी केली असता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तातडीने संबंधित जानाई योजनेचे अधिकारी यांना सुचना करून जानाई योजना सुरू करण्यास सांगुन जे लाभार्थी पैसे भरतील त्यांना पाणी देण्याच्या सुचना केल्यानंतर गुरूवारी सकाळी जानाई योजना सुरू करण्यात आली असुन लाभार्थी शेतकरी यांनी लवकरात लवकर पैसे जमा करून योजनेचा लाभ घ्यावा असी विनंती जानाई योजनेच्या अधिकारी यांनी केली आहे. 
To Top