निरा खोऱ्यात संततधार सुरूच .....! वीर धरणात २४ तासात १० टक्के पाणीसाठ्यातवाढ....तर गुंजवणी ४७ टक्क्यांवर.....!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. 
            यावर्षी मान्सून पावसाने निरा खोऱ्याला हुलकवणी दिली असली तरी मात्र आषाढी पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार सुरुवात केली आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत भाटघर धरण क्षेत्रात ३३७ मीमी पावसाची नोंद झाली असून ३०.६७ टक्के पाणी साठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात ७१३ मीमी पावसाची नोंद झाली असून २७.६२ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात १३२ मी मी पावसाची नोंद झाली असून ५७ टक्के धरण भरले आहे तर गुंजवणी धरण क्षेत्रात ८०२ मी मी पावसाची नोंद झाली असून ४६.४२ टक्के धरण भरले आहे.
To Top