वाई ! प्रतिनिधी दौलतराव पिसाळ ! पुणे-बेंगलोर हायवेवर पुणे- तासगाव बसच्या चालकाला येते अचानक चक्कर : त्याने थेट उसाच्या शेतात बस घालत वाचवले प्रवाशांचे प्राण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
साताऱ्यात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज येथे पुण्याहून तासगावच्या दिशेने निघालेल्या एसटी बस मधील चालकाला अचानक चक्कर आल्याने बस वरील ताबा सुटून झालेल्या अपघातात बस रस्त्यालगत असणाऱ्या एका उसाच्या शेतात असणाऱ्या इलेक्ट्रिक पोलला धडकली आहे.या बसमध्ये ३२ प्रवाशी प्रवास करत होते.सुदैवाने कोणतीही जीविहानी झालेली नाही. भुईंज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे
To Top