Big Breaking ! तुमच्या विहीरी बोअर आता कोरडी पडणार ...! बारामतीच्या बागायती भागाची वाटचाल जिरायती भागाच्या दिशेने? नीरा डावा कालवा होणार काँक्रटीकरण....!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती व इंदापूर तालुक्याला वरदान ठरलेल्या वीर धरणावरून आलेल्या नीरा डाव्या कालव्याचे अस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असून भागायती भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. 
          एकूण १५२ किलोमीटर लांबी असलेल्या नीरा डाव्या कालव्यावर दर पाच किलोमीटर अंतरावर ४०० मीटर चे काँक्रटीकरण होणार आहे. ज्या ठिकाणी पाणी गळती होत आहे अशा ठिकाणी हे काँक्रटीकरण केले जाणार असल्याचे जरी पाटबंधारे विभाग सांगत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने हे काम सुरू केल्याचे सांगितले जात आहे. 
------------------------
काँक्रटीकरण कशाला?
नीरा डाव्या कालव्यामुळे हजारो हेक्टर जमीन बागायती आहे. जर कॅनॉलचे अस्तारिकरण झाले तर अगोदरच कर्जाच्या बोजाने मेलेला शेतकरी पुन्हा मेल्याशिवाय राहणार नाही. विहिरी बोअर कोरडी पडतील. त्यामुळे हे अस्तारिकरण थांबणे गरजेचे आहे. जर कॅनॉल मधील गाळ काढला तर २० टक्के पाणी वाढू शकते. त्याला काँक्रटीकरण कशाला असा सुरू शेतकरी काढत आहेत.
To Top