सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे बारामतीच्या पोलीस पथकाने ऑनलाइन जुगार व अवैद्य दारू धंद्यावर टाकलेल्या छाप्यात ११ जणांना ताब्यात घेतले आहे.
बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन चे सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. सर्व आरोपीना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.