भोर ! जानाईदेवी यात्रा कमिटी अध्यक्षपदी गणेश पवार यांची निवड

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी 
भोर शहराचे ग्रामदैवत जानाई देवी उत्सव तसेच रामनवमी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक गणेश पवार यांची कमिटीच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली.
              गणेश पवार हे कायमच सामाजिक बांधिलकी जपत समाज हितासाठी हिरहिरीने झटत असतात.तसेच तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने शहरात त्यांचा नावलौकिक आहे.यात्रा कमिटीच्या सभेत एकमताने त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने तालुक्यातून तसेच शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी गणेश कांबळे, अमित कोठावळे, अमित सुर्वे, राजेंद्र भेलके सुधीर दिघे,आप्पा दळवी, गुलाब किवळे, दत्तात्रय भेलके, किरण कांबळे, आदींसह ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top