भोर ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! भोर पोलीस ठाण्यात समूह राष्ट्रगीत गायन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  स्वराज्य महोत्सव अंतर्गत बुधवार दि.१७ भोर पोलीस ठाणे येथील आवारात पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली समूह राष्ट्रगीत गायन श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
    समूह राष्ट्रगीत गायनावेळी भोंगवली येथील शहीद जवान नवनाथ भांडे यांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली.यावेळी उपनिरीक्षक बळीराम सांगळे, पोलीस हवालदार उद्धव गायकवाड,अशोक खुटवड, विकास लगस ,दत्तात्रय खेंगरे,सुनील चव्हाण, एस एम मुलानी, व्ही.एस.भोसले,आर.जी.मखरे ,एम.बी.कराडे, जे. बी.कडाळे,बसरापूर येथील पोलिस मित्र केशव साळुंके तसेच शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.के वाघ , प्रा.रवींद्र दळवी ,संतोष घोरपडे ,सुनील थोपटे आदींसह शेकडो विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.
To Top