सोमेश्वर रिपोर्टर टीम------
महाबळेश्वर : देवानंद पवार
सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सर्व परिपत्रकांची व नियमांची तात्काळ अमंलबजावणी व्हावी म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, सातारा जिल्हा यांच्या वतीने लेखी निवेदन जिल्हाधिकारी ,सातारा यांना देण्यात आले.
उपजिल्हाधिकारी महसूल प्रशांत आवटे यांनी हे प्रशासनाच्या वतीने स्विकारले .
सर्व शासकीय कार्यालयात आपल्या अधिकाराचा वापर करून योग्य त्या पातळीवर आदेश देऊन संबंधित विभाग प्रमुखांना याबाबत सुचना देऊन खालील बाबींची पूर्तता तात्काळ करण्याचे आदेश पारित व्हावेत असे या निवेदनात म्हटले आहे.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या गळ्यात ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाच्या वेळेत ९•४५ ते ६•१५ कार्यालयात उपस्थित राहणे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली लावण्यात यावी .जे अधिकारी फिल्डवर काम करतात त्यांची हजेरी आँनलाईन लोकेशनने घेण्यात यावी .शासकीय अधिकारी व कर्मचारी कामाच्या वेळेत कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले असल्यास हालचाल रजिस्टरला तशी नोंद करणे.सर्व शासकीय कार्यालयांची कर्तव्यसूची वेबसाईट वर उपलब्ध करणे, तसेच वेळोवेळी अद्ययावत ठेवणे. प्रत्येक शासकीय कार्यालयात अभिप्राय नोंदवण्यासाठी अभिप्राय फाँर्म उपलब्ध ठेवणे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळेत व्यसन न करणे.शासकीय कार्यालयातील शिपाई गणवेशात असणे.अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामी राहणे. प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४ प्रभावी अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी अमंलबजावणी व पडताळणी यंत्रणा उभी करण्यात यावी.सर्व शासकीय कार्यालयात दप्तर दिरंगाई कायद्याची अमंलबजावणी प्रभावीपणे करणे.सर्व शासकीय कार्यालयाला कार्यालयीन कामासाठी दिलेली वाहने खाजगी कामासाठी वापरण्यात येऊ नये यासाठी ताकीद देणे. सर्व शासकीय कार्यालयात दर सोमवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत नागरिकांसाठी माहिती उपलब्ध करून देणे .तसा बोर्ड दर्शनी भागात लावणे.सर्व शासकीय व खाजगी कार्यालयात महिला लैंगिक शोषण विरोधी समिती गठीत करण्यात यावी .सर्व शासकीय कार्यालयात सी.सी.टिव्ही लावण्यात यावे व ते कार्यान्वित असावेत. आपली रचना ,कार्ये आणि कर्तव्ये यांचा तपशील .आपले अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये .निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली .स्वतः ची कार्ये पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून ठरविण्यात आलेली मानके ,त्यांच्या कडे असलेले किंवा त्यांच्या नियत्रंणात असलेले किंवा कार्ये पार पडण्यासाठी त्यांच्या कर्मचारीवर्गाकडून वापरण्यात येणारे नियम ,विनिमय, सूचना नियमपुस्तिका आणि अभिलेख .त्यांच्या कडे असलेल्या किंवा त्यांच्या नियत्रंणात असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण .आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अमंलबजावणी करण्याच्या संबंधात लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील.
आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून गठीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तीच्या मिळून बनलेल्या मंडळाचे ,परिषदांचे ,समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण .आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका .प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणारे मासिक वेतन तसेच प्राधिकरणाच्या विनियमांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याच्या पद्धती.जन माहिती अधिकारी यांची नावे ,पदनामे आणि इतर तपशील .विहित करण्यात येईल अशी माहिती अशी माहिती जनतेसाठी खुली करायची आहे. जेणेकरून नागरिकांना शक्यतो माहिती मागण्यासाठी कोणाकडेही जाण्याची वेळ येणार नाही.
तरी आपणास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ ,महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हा यांच्या वतीने वरील बाबींची पूर्तता सर्व शासकीय कार्यालयात होण्यासाठी आदेश पारित करावेत. त्याबाबतची संपूर्ण पत्रव्यवहाराची माहिती आम्हाला पाठवण्यात यावी.अगर तसे न घडल्यास व संबंधित शासकीय कार्यालयात नियमांचे उल्लंघन होताना आढळल्यास त्याबाबत आम्ही आंदोलन केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष जावेद आत्तार ,उपाध्यक्ष अभिजात लेंभे ,जिल्हा संघटक कपिल राऊत ,जिल्हा संपर्क प्रमुख संदीप पवार ,सुरेश पवार ,संदीप गाढवे ,सुनिल मांढरे ,देवानंद पवार ,नंदकुमार धनवडे ,किरण शितोळे ,राकेश कांबळे यांच्या सह्या आहेत.