सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : धनंजय गोरे
करहर ता.जावली येथे भाजपाच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत "मन की बात" चे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमासाठी सातारा - जावली विधानसभेचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते,यावेळी बोलताना त्यांनी आगामी काळात होणाऱ्या मतदार संघातील सर्व निवडणुका या पक्षाच्या कमळ या चिन्हावर लढ़वण्याच्या सूचना सर्वना यावेळी दिल्या, या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे व करहर विभागातील आशा सेविका तसेच करहर विभागातील पक्षाचे पदाधिकारी यांच्या बहुसंख्य उपस्थितीत मन की बातचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले,भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात असून , येत्या १३ ते १५ आँगस्ट पर्यत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. तसेच कुठेही तिरंगा झेंडा कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी.घरोघरी तिरंगा हा उत्सव मोठ्या अभिमानाने सर्वांनीच सहभाग नोंदवावा. शाळा,सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी जाऊन घरोघरी अभियान राबविण्यासाठी प्रबोधन करावे. पदाधिकाऱ्यांनी कसलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले.
येणाऱ्या सर्वच निवडणूका भाजपाच्या कमळ चिन्हावर लढवल्या जातील त्या दृष्टीने भाजपा पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. भाजपाची धेय्य धोरणे प्रत्येक बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहचवावीत.
आशा सेविकांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक सहकार्य असून, आता सरकार आल्यामुळे मानधन वाढीसाठी ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे आशा स्वयंसेविकांच्या शिष्ठमंडळास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आश्वासन दिले.
तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी प्रस्तावना मांडली तर माजी उपसभापती रविंद्र परामणे यांनी आभार माणले. प्रमोद शिंदे , उपाध्यक्ष किरण भिलारे, प्रदिप बेलोशे, अविनाश पवार, दिपक गावडे, भाईजी गावडे, संजय बिरामणे, राजेंद्र गोळे, गोरख महाडिक, देवेंद्र राजपूरे, मोनिका परामणे,पिंपळीच्या माजी सरपंच सौ निलिमा अविनाश पवार तसेच आशा सेविका शिष्ठमंडळातून सौ पौर्णिमा श्रीहरी गोळे, मंगल पांगारे, अरूणा शिर्के, वर्षा भिसे, कल्पना इंदलकर, मोनाली नवसरे, वैशाली तरडे, मिनाक्षी नवसरे, राणी परामणे आदी सेविका उपस्थितीत होत्या.