सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मजगांव : बाबुराव गोळे
मुरुडच्या जंजिरा विद्या मंडळ संचालित सर एस ए हायस्कूल व स्व.म.ल.दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती भारती अशोक पाटील आपली २२ वर्षे उत्तम प्रकारे सेवा करुन नुकत्याच निवृत्त झाल्या.
जंजिरा विद्या मंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी उपाध्यक्षा प्रतिभा जोशी ,सचिव चंद्रकांत अपराध ,संचालक प्रमोद भायदे,माजी मुख्याध्यापक उदय गद्रे ,रमेश मोरे क्रीडा शिक्षक पी. के.आरेकर मुख्याध्यापक सरोज राणे अंजू दांडेकर त्यांचे सर्व नातेवाईक समाज बांधव तसेच शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी व मॉर्निंग स्टारचा सर्व स्टाफ उपस्थित होते. या प्रसंगी उदय गद्रे ,पी.के.आरेकर प्रमोद भायदे,प्रतिभा जोशी,महेंद्र पाटील , उज्वला गोंजी,विजय कदम,मुख्याध्यापक सरोज राणे यांनी भारती ताईंचा सेवेतील प्रामाणिकपणा , आदरयुक्तपणा तसेच पतिची आजारपणात केलेली निरंतर सेवा,मुलावर केलेले संस्कार समाजात एक आदर्श पत्नी इ.अनेक गुणांचे कौतुक केले तिचे नातेवाईक धनाजी पाटील,सुधीर झावरे यांनी अनुकंपात सेवा करण्याची संधी दिल्यानंतर संस्था व शाळेतील सर्व कर्मचारी यांनी तिला सांभाळून घेतल्यामुळे ती सेवा काल पूर्ण करू शकली. असे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे विशेष आभार मानले.
शाळेतील सर्व स्टाफ, मॉर्निंग स्टाफ ,सर्व नातेवाईक तसेच संस्थेच्या वतीने प्रेमाची भेटवस्तू देऊन भारती पाटील यांना गौरविण्यात आले . अध्यक्षीय भाषणात जंजिरा विद्या मंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर यांनी त्यांचे कौतुक करताना त्यांनी शाळेसाठी प्रामाणिकपणे सेवा केली असून कुटुंबाप्रमुखा प्रमाणे प्रत्येक कर्मचार्यांना सांभाळून घेण्याची या संस्थेची परंपरा असल्याचे विशेष नमूद केले . मोठ्या संख्येने प्रेम करणाऱ्या नातेवाईकांची आपुलकी त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मिळविली असून भविष्यात त्या निरोगी जिवन जगू शकतील असा विश्वास अध्यक्षांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतातून व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली रोटकर यांनी तर पर्यवेक्षक रमेश मोरे यांनी आभार मानले.