वाई ! शिरगाव मध्ये ढगफुटीने झालेल्या नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करा : आ.मकरंद पाटील

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी  
वाई तालुक्याच्या पुर्व भागातील डोंगर कुशीत वसलेल्या शिरगावाच्या डोंगर माथ्यावर दि.२७ ला ढग फुटी झाल्याने गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामस्थांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा महापुर पाहिला पावसाच्या या हाहाकारा 
मुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांना समजल्यावर त्यांनी वाईचे तहसीलदार रणजित भोसले वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायणराव घोलप बांधकाम विभागाचे उपअभियंता जाधव व इतर विभागांच्या अधिकारी वर्गांचा ताफा सोबत घेऊन आ.पाटील यांनी गावात ग्रामस्थांची बैठक घेऊन झालेल्या नुकसानींची माहिती घेऊन विविध ठिकाणच्या नुकसान ग्रस्त परिसराची प्रत्यक्ष पाहणी करुन तातडीने पंचनामे करण्याची विनंती सोबत ऊपस्थित असलेल्या अधिकारी वर्गांना या वेळी दिली 
         शिरगाव ता. वाई येथे दिनांक २७ रोजी प्रंचड मोठ्या प्रमाणात चवणेश्वराच्या डोंगर माथ्यासह शिरगावच्या डोंगर माथ्यावर विजेच्या कडकड्यासह ढगांच्या गडगडासह     ढग फुटी झाल्याने डोंगरा वरील पाण्याचा लोट बेल परिसरात असणरा पाझर तलाव क्र.१ फुल भरुन ओसंडून वाहु लागल्याने गावातील ओढ्यात महापुराचा थरार या वेळी ग्रामस्थांनी अनुभवला डोंगर माथ्यावर पडलेल्या  पावसाच्या पाण्याने शेतकर्यांच्या शेतजमीनींच्या ताला फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर पाण्याचा प्रवाहा बरोबर वाहत आलेली माती ओढ्याच्या कडेला असणार्या शेतकर्यांच्या विहिरीत घुसल्याने विहीरी गाळाने भरल्या आहेत 
    पाण्याचा हा अचानक निर्माण झालेला थरार पाहण्या साठी  सर्व नागरिक रस्त्यावर आले व एकच कल्लोळ उठला होता या भयानक पावसाच्या पाण्या मुळे काही महिन्या पुर्वीच लाखो रूपये खर्च करून पिसाळ वस्तीत जाणारा रस्ता पाण्याच्याा प्रवाहा बरोबर वाहून गेला आहे तर शिरगाव ते देगाव जाणार्या रस्त्याची देखील दयनीय अवस्था झाली आहे 
याची दखल आमदार मकरंद पाटील यांनी घेऊन सोबत  वाईचे तहसीलदार रणजीत भोसले,गट विकास अधिकारी नारायण घोलप,  मंडलाधिकारी नरेंद्र गायकवाड गावकामगार तलाठी ग्रामसेवक असा एकत्रीत शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा ताफा  तातडीने शिरगाव या  गावात दाखल झाला आमदार मकरंद पाटील व शासकीय अधिकारी वर्गांने या वेळी ऊपस्थित ग्रामस्थांच्या व्यथा एकुण घेऊन शेतकर्यांचे झालेल्या नुकसानी साठी शासन स्तरावर जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन येथील ग्रामस्थांना या वेळी देण्यात आले .या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर भोसले सरपंच निलमताई भोसले उपसरपंच दिपक शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच दिपक तोरडमल  धर्मु भोसले चेअरमन रामचंद्र भोसले विनायक भोसले तुषार कानडे  पोलिस पाटील उज्वला भोसले आणी नुकसान ग्रस्त शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
To Top