भोर ! संतोष म्हस्के ! 'त्या' दोघांनी बांधली होती 'सात' जन्माची गाठ : पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीने सोडला जीव

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर - प्रतिनिधी
भोर तालुक्याचा दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील नेरे ता.भोर येथील काँग्रेसचे कट्टर बुजुर्ग कार्यकर्ते बाळासाहेब गणपती आवारी वय -९० यांचे वृद्धापकाळाने बुधवार दि.१०रोजी निधन झाले. काही वेळातच त्यांच्या पत्नी वेणुबाई बाळासाहेब आवारी वय - ८५ यांनी आपले प्राण सोडले. पती- पत्नीच्या एकाच वेळच्या निधनाच्या घटनेमुळे नेरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
     बाळासाहेब आवारी यांची वीसगाव खोऱ्यातील  काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख होती.तर ते नेरे गावचे प्रगतशील शेतकरी तसेच विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व गावचे खजिनदार म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले होते.आवारी दाम्पत्याची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली होती यावेळी शेकडो जनसमुदाय शोकाकुल वातावरणात उपस्थित होता. पती-पत्नीचे एकाच वेळी निधन ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे समजते.
To Top