जावली ! मेढा चौकातील पुनर्स्थापित स्मारकाचे काम पूर्णत्वास गेल्यावरच उद्घाटन केले जाईल :आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
जावली तालुक्याच्या मातीत ऐतिहासिक परंपरेला छत्रपतींच्या पावन भूमित देशासाठी लढवय्यांनी दिलेली प्रेरणा व त्यांनी केलेल्या कामगिरीची आम्ही दखल घेत असून आदर्श जावळीच्या लोकांनी सैनिकी परंपरेतील काम नव्या पिढीला दिशा व आदर्श देण्याचे काम या सैनिकांमुळे घडत असल्याचे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 
        प्रती वर्षाप्रमाणे ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मेढा येथील जागतिक महायुद्धात 1914 ते 1919 या कालावधीत मराठा लाईट इनफट्री  यूनिट मधील कूसावडे बामणोली येथील जवान कोंडीबा गोपाळ 
मरागजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज अपूर्ण अवस्थेतील स्मारकाचा उद्घाटना कार्यक्रम पुढे ढकलून तो स्मारकाची प्रतीकात्मक कामे पूर्ण झाले नंतर घेवू असे सांगून फक्त अभिवादन कार्यक्रमात करण्यात आला..
        यावेळी सातारा उपविभागीय अधिकारी  मिनाज मुल्ला, तहसीलदार 
राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे,सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने,मेढा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार निवासी नायब तहसीलदार संजय बैलकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते...
     विटा सातारा मेढा मार्गे महाबळेश्वर रस्ता रुंदीकरण कामास अडथळा निर्माण होत असलेल्या मेढा चौकातील शताब्दीवर्षा पूर्वीच्या स्मारकाच्या पुनर्स्थापित जागेत या सोहोळ्याच्या कार्यक्रमास आलेल्या हुतात्मा जवानांचे वंशज आनंद मरागजे यांनी प्रास्ताविकात म्हणाले की पूर्वी प्रमाणे असलेल्या स्मारकाची प्रतिकृती बनवून जावली तालुक्याची अस्मिता जगविण्यासाठी महसूल विभागाने प्रामाणिकपणे आपली भूमिका स्पष्ट केली.बांधकाम विभाग व रस्ता रोडवेज सोल्युशन कंपनीने बांधलेल्या स्मारकास नाराजी व्यक्त करून पूर्वी प्रमाणे असलेल्या बांधकामाच्या धर्तीवर हे स्मारक उभारण्याची मागणी केली.त्यास तातडीने आ. भोसले यांनी उद्घाटन समारोह स्थगित करून फक्त अभिवादन कार्यक्रमास करण्याची वेळ आज बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे आली. 
    या कार्यक्रमास जवळवाडी सरपंच 
सुरेखा मर्ढेकर,मंडलअधिकारी संतोष  मुळीक, आनंद सकपाळ, राजेंद्र सावंत,सूरज सावंत परिसरातील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत सतीश मर्ढेकर यांनी केले 
     

=============================
सर्वसमावेशक अशा स्मारकाची पुनर्स्थापित मूळ रचना होती त्याच धर्तीवर उभारणी करण्याच्या सूचना अधिकारी व रोडवेज सोल्युशन कंपनीस आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या असून या सूचनांचे पालन त्वरित करून संबधित यंत्रणेस काम तातडीने करण्याच्या दृष्टीने महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी तथा प्रांत मिनाज मुल्ला यांनी दिल्या.असून हयगय करणार्‍या संबधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यास पाठीशी घालणार नसल्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले.
==========================

     जावली तालुक्यातील सैनिकी परंपरेला साजेसे असलेल्या स्मारकासाठी तहसील विभागाच्यावतीने वतीने विशेषता तहसीलदार राजेंद्र पोळ, व नायब तहसीलदार संजय बैलकर यांच्या मध्यस्थीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रा उभे राहणारे पुनर्स्थापित स्मारक जावली तालुक्याचे अभिमानात व सौंदर्यात भर घालणारे ठरेल 
             बाजीराव चिकणे 
          जेष्ठ समाजसेवक जावली 
=============================
To Top