सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरालगत असणाऱ्या रामबाग - उञौली रोडवर एकाच राञीत चार व्यवसाय धारक दुकानाच्या शटरची कुलूपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु काही दुकानातून खाद्य पदार्थ , रोख रक्कम चोरीस गेले आहेत. तरी भोरच्या नागरिकांनी सावधान राहवे. असे आवाहन भोर पोलिसांनी केले आहेत.
भोर तालुक्यात सध्या महावितरण कंपनीच्या वीजचा खेंळखडोबा सुरू असल्याने यांचा फायदा चोरट्यांना होत असल्यामुळे ग्रामीण भागासह शहरात चोरट्याची सुळसुळाट होत आहे. तालुक्यातील खेडेगावात राञीच्या वेळी पितळाचे बंब, भांडी चोरी गेल्याच्या घटना घडत आहे. तर भोर शहरातील रामबाग रोड ते उञौली मंगळवार ( दि. ९) रोजी मध्य राञीत दिघे प्राईड , भेलके हाँटेल , हिरो हाँडा शोरुम , पान टपरीच्या शटरची कुलपे फोडून शटर उचकटण्यात आली होती. परंतु चोरट्यांचा चोरी करतना काही सापडले नाही. तर पान टपरीतील रोख रक्कम , चिल्लर , शेंगदाणे लाडूची बरण्या चोरीस गेले आहेत. वरील पैकी एकाच व्यवसायकांनी भोर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
---------------
तालुक्यात सध्या चोरट्याचा सुळसुळाट असून
नागरिकांनी राञी झोपताना सावध झोपावे .आजू बाजूच्या गावातील लोकांचे संपर्क क्रमांक ठेवावे. तसेच भोर पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहवे असे आवाहन पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी केले.