सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत ज्यूबिलियंट जवळील (काकडे कॉलनी ) येथे चोरट्याने दोन घरांची कुलपे तोडून चिरिमीरीवर डल्ला मारला मात्र हातात काहीच न लागल्याने त्यांनी घरातील वास्तूंची तोडफोड केली.
सविस्तर नीरा येथे जुबिलियंट कंपनी नजीक निंबुत हद्दीत काकडे कॉलनी येथे काल दि ९ रोजी रात्री एक नंतर चोरट्यांनी दोन घरे घरे फोडली असून हातात काहीच न लागल्याने घरातील वस्तूंची तोडफोड केली आहे. मधुकर नारायण काकडे व शिवाजी बबन काकडे यांची घरे फोडण्यात आली असून याबाबत बाळासाहेब काकडे यांनी नीरा पोलिसात तक्रार दिली आहे.