सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
साई सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू मधील तज्ञांमार्फत महिलांमधील स्त्रीरोग , त्वचारोग व दिनचर्या याविषयी माहिती डॉ जयश्री भिलारे तसेच डॉ विद्यानंद भिलारे यांनी दिली.
महिलांमधील आरोग्याविषयी समज गैरसमज, व्यसन , मानसिक तणाव आणि कमी वयात होणारे मधुमेह थायरॉईड, ब्लड प्रेशर , वजन, चरबी, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम इ.विषयी समुपदेशन केले. नुसरतजहाँ इनामदार, सदस्या,संजय गांधी निराधार योजना बारामती तालुका यांनी योजना संदर्भात माहिती दिली. हर्षदा कदम, अध्यक्ष, ग्रामसंघ मुरुम यांनी महिला सक्षमीकरण बाबत व महिला बचत गट बँकांना जोडल्याने बँकांमार्फत बचत गटांना कर्ज प्रकरणे मंजूर होत आहेत,तरी महिलांनी लाभ घ्यावा,असे सांगितले..इंदुबाई भगत, सरपंच, मुरुम यांनी घरोघरी तिरंगा?बाबत नियोजन संदर्भात माहिती दिली.
शहाजहान बाणदार, ग्रामविकास अधिकारी, यांनी महिलांना ग्रामपंचायत मार्फत व्यावसायिक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असल्याने महिलांनी लाभ घ्यावा असे सांगितले. सदर सभेला ग्रा.पं. सदस्या राणी माहुरकर, नलिनी जगताप, निलेश शिंदे तसेच मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. रूपाली सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.