इंदापूर ! बंदुकीचा धाक दाखवत ३ कोटी ६० लाख लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : अवघ्या ७२ तासात स्थानिक गुन्हे शाखा व इंदापुर पोलीसांची दमदार कारवाई

Admin
 
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
 भावेशकुमार अमृत पटेल, रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना, राज्य गुजरात व्यवसाय कुरीअर सर्व्हिसेस वितरक हे नांदेड, लातूर व सोलापूर येथील पार्सल घेवून दि. २६/०८/२०२२ रोजी पहाटेच्या वेळी सोलापूर येथून मुंबई येथे जाणेसाठी निघाले होते. इंदापुर टोल नाका पास करून पुढे वरकुटे पाटी येथील गतीरोधक जवळ गाडीचा वेग कमी झाल्याने पहाटे ०२:३० वा. सुमारास ६ अनोळखी इसमांनी फिर्यादीचे गाडीजवळ येवून त्यांना लोखंडी रॉड दाखवत अडविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्यांना त्यांची गाडी भरधाव वेगाने पुढे काढली त्यावेळी त्यांचे गाडीचा दोन चारचाकी वाहनांनी पाठलाग सुरू केला. वरकुटे पाटी पासुन पुढे सात ते आठ किलोमीटर अंतरावर पोहोचले नंतर पाठलाग करणारे गाडीतून फिर्यादीचे स्कॉर्पिओ गाडीवर बंदुकमधुन फायरींग करणेत आली. त्या दरम्यान पाठलाग करणारे एका चारचाकी वाहनाने स्कॉर्पिओ गाडीला आडवी मारून स्कॉर्पिओ थांबविली. त्यावेळी एकुण सहा अनोळखी इसमांनी फिर्यादीस व त्याच्या सोबत इसम नामे विजयभाई सोलंकी यास मारहाण करून फिर्यादीला स्कॉर्पिओ मधुन उतरवुन त्यांचेकडील दुसऱ्या गाडीत बसविले. त्यानंतर पुढे नेवुन गाडीमध्ये ठेवलेली सर्व रोख रक्कम, फिर्यादी व सोबतचे इसमाचे मोबाईल व त्यांचे खिशातील रोख रक्कम असे एकुण तीन कोटी साठ लाख सव्वीस हजार रूपयांचा माल दरोडा टाकून चोरून नेला. त्यानंतर फिर्यादी व चालक यांना स्कॉर्पिओसह स्वामी चिंचोली गावाचे परीसरात सोडून दिले. झालेल्या प्रकरणावरून फिर्यादी यांनी इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं ६६७ / २०२२ कलम ३९५, ३९७,३६४ अ, आर्म अॅक्ट ३,५,२५ म.पो. अधि. १३५ अन्वये . दिनांक २६/०८/२०२२ रोजी गुन्हा दाखल आहे.

सोलापुर - पुणे या मुख्य हायवे रोडवर फायरींग करून दरोडयाचा प्रकार झालेला असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा.डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, साो पुणे ग्रामीण यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोनि अशोक शेळके यांना तपासाच्या सुचना व मार्गदर्शन करून गुन्हयातील आरोपी जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या. गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन तपास पथके तयार करून त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले. तसेच इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, यांचेकडील तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. असे एकुण सहा तपास पथके तपासकामी तयार करण्यात आली होती.
        .डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक,. मिलिंद मोहिते, अपर पोलीस अधीक्षक,. गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांनी स्वतः भेट देवून मार्गदर्शन केले तांत्रिक विश्लेषणाचे व गुप्त बातमीचे आधारावर सदरचा शुन्हा सागर शिवाजी होनमाने रा. कुर्डुवाडी ता. माढा जि.सोलापूर याने त्याचे इतर साथीदारांसह केला असल्याची बातमी स्था.गु. शाखेच्या तपास पथकाला मिळाली. त्या अनुषंगाने एक पथक ताबडतोब कुर्डुवाडी परीसरात रवाना केले. तपास पथकाने संशयीत इसम १) सागर शिवाजी होनमाने, वय ३४ वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर २) बाळु उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम, वय ३२ वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, ३) रजत अबू मुलाणी, वय २४ वर्षे, रा.न्हावी, ता. इंदापूरयांना ताब्यात घेतले. त्यांचेकडील अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांसह गुन्हयाची कबुली दिली आहे.
         सदर आरोपींकडे केलेल्या अधिक तपासात १) सागर शिवाजी होनमाने यांचेकडुन ७ लाख रूपये रोख २ ) रजत अबू मुलाणी, याचेकडुन ७१ लाख २० हजार रूपये असे एकुण १,४३,२०,०००/- रूपये जप्त करण्यात आले आहेत. त्यादरम्यान अटक प्राप्त माहितीनुसा स्थानिक गुन्हे शाखा व इंदापुर पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक असे दोन पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने गुन्हयातील सहभाग असणारे आरोपी नामे १ गौतम अजित भोसले, वय ३३ वर्षे, रा. वेने, ता. म्हाडा, जि. सोलापुर, २) किरण सुभाष घाडगे वय २६ वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापुर, जि. पुणे, ३) भुषण लक्ष्मीकांत तोंडे, वय २५ वर्षे, रा लोणीदेवकर, ता. इंदापुर, जि. पुणे यांना राजस्थान उदयपुर येथील प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलीसांच्या मदतीने राजस्थान येथुन ताब्यात घेतलेले आहे.
      सदरची कामगिरी ही. डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक  मिलींद मोहिते अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, .गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शेळके, पोलीस उप निरीक्षक, अमित सिदपाटील, पोलीस उप निरीक्षक, गणेश जगदाळे, सहा फौजदार रविराज कोकरे, तुपार पंदारे, बाळासाहेब करांडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजय घुले, जनार्दन शेळके, राजु मोमीण, विजय कांचन, असिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वाप्निल आहीवळे, प काँ अक्षय नवले, चालक पो हवा प्रमोद नवले, होम. जयेश पाथरकर, पो हवा रविंद्र पाटमार नेम वालचंदनगर पो.स्टे, तसेच बारामती शहर येथील पो. हवा. कल्याण खांडेकर, इंदापुर पो. स्टे पो.नि. प्रभाकर मोरे, सपोनि प्रकाश पवार, सपोनि महेश माने, पोसई सुधीर पांडुळे, पोना सलमान खान, पोका विशाल चौधर, पोहवा सुरेद्र वाघ, पोहवा कल्यान खांडेकर, नोहवा मनोज गायकवाड, पोहवा सचिन बोराडे, पोना मोहमंद आली मड्डी, पोना बापु मोहीते, पोकॉ लक्ष्मण सूर्यवेशी, पोकॉ दिनेश चोरमले, पोकों विनोद काळे, पोका सुरज गुंजाळ यांनी केली. तसेच प्रतापनगर पोलीस ठाणे राजस्थान येथील पोलीस निरीक्षक दर्शन सिंग राठोड, पो. हवा. बुटी राम पो. हवा. गोविंद सिंग, पो. कॉ. रूद्रा प्रताप सिंग यांनी राजस्थान येथे आरोपी अटक करणे काम मदत केली.
To Top