वाई ! दौलतराव पिसाळ ! 'किसनवीर'चे सभासद, कामगार म्हणतात....! नेतृत्व कसं असावं... तर नितीनकाकांसारखं असावं...! कारखान्यातील विविध विभागांना भेटी देत जाणून घेतल्या अडीअडचणी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ 
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर ५ मे २०२२ रोजी अभुतपुर्व सत्तांतर होऊन वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे आमदार मकरंद आबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन सत्तेत आले. कारखान्यावर असलेला कर्जाचा डोंगर, शेतकऱ्यांची थकीत एफआरपी, कामगारांचे २५ महिन्यांचे न झालेले पगार, कारखान्यामध्ये एकही साखरेचं पोतंही नाही, कारखान्यातील मशिनरींची कामे अशा विविध समस्या. नविन व्यवस्थापनापुढे हा कारखाना प्रथम सुरू करून सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा हे उद्दिष्ठ होते. त्यानंतर त्यांनी याबाबत शाश्वत पाऊलेही उचलली. त्यामुळे आज किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व कामगारांमध्ये एक आनंदाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र आज दिसत आहे.
            आमदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने किसन वीर कारखान्यातील अंतर्गत कामांना सुरूवात करून किसन वीर व खंडाळा कारखाना कोणत्याही परिस्थितीत १ ऑक्टोंबरला सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याने मील रोलर पुजन केले तो म्हणजे आपला किसन वीर कारखाना. तसेच तोडणी वाहतुक कंत्राटदारांनाही पहिला हप्ता दिलेला असून दुसरा हप्ताही त्यांच्या खात्यात लवकरच जमा करणार असल्याचेही सांगुन त्या वर्गामध्येही आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कारखान्यातील मशिनरींची कामेही अंतिम टप्प्यात आहेत.
शनिवार (दि. २७) रोजी जिल्हा बँकेचे चेअरमन व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीन काका पाटील यांनी कारखान्यातील को-जन विभाग, इंजिनिअरिंग विभाग व उत्पादन विभागास समक्ष भेट देऊन कारखान्यातील कामांचा आढावा घेतला. नुसता आढावाच नाही तर कर्मचाऱ्यांनी हितगुज साधत त्यांच्या अडी-अडचणींही विचारणा करून आपल्याला हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत १ ऑक्टोंबरला सुरू करायचा आहे. त्यामुळे जी अंतर्गत कामे आहेत ती लवकरात लवकर करण्यात याव्यात व काही अडचण असली तर कोणत्याही वेळेला सांगा त्याचा निपटारा लगेच केला जाईल, असे आश्वासनही दिल्याने कामगार वर्गातही आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. आजपर्यंत कारखान्याच्या काही विभागांमध्ये कोणताही संचालक ज्या ठिकाणी गेलेले नव्हते त्या त्या ठिकाणी नितीन काकांनी जाऊन कामाची पाहणी केली. कामगारांनीही यावेळी आमदार मकरंद आबा पाटील व व्यवस्थापनाला कोठेही बाधा येणार नाही असे वर्तन न करता आपल्या निर्धारानुसार कारखान्यातील अंतर्गत कामे १ ऑक्टोंबरच्या आधीच करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, संचालक प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, कारखान्यातील अधिकारी वर्ग, कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top