सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील गावांना विजा वारा आणी
गडगडासह सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने तब्बल दोन तास
झोडपून काढल्याने गणेश ऊत्सवा साठी तालुक्यातील गावा गावांन मधुन वाई शहरात खरेदी साठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ ऊडाली .
वाई तालुक्यातील गावांन मध्ये सकाळ पासून कडकडीत ऊन होते त्या मुळे पावसाची आजीबात शक्यता नव्हती पण चार वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गावांन मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते .अखेर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक पणे वीज वारा आणी ढगांच्या कडकडासह मुसळधार पावसाने सुरवात केल्याने आज बसणार्यां गणपतीच्या उत्सवासाठी विविध वस्तूंची खरेदी करण्या साठी वाई शहरात आलेल्यांची तारांबळ ऊडाल्याचे दिसत होते पावसाची सुरवात होताच मुख्य बाजार पेठेतील विध्दुत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना खरेदी करण्या साठी अडचणी निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली होती .