सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे - नीरा दरम्यानचे पिसुर्टी येथील रेल्वे गेटचे आज दिवसभर चाललेले काम बारा तासांनी पुर्ण झाल्यानंतर आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आज दिवसभर गणरायाच्या उत्सवासाठी आपल्या घरी जाणाऱ्या भाविकांन तब्बल ४० किलोमीटरचा वळसा बसत होता तो आता बसणार नाही.
पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - मिरज लोहमार्गावरील वाल्हे नीरा दरम्यान पिसुर्टी येथे असलेल्या रेल्वे फटका मधील लोहमार्गाच्या दुरुस्तीचे व दुपदरीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून करण्यात येत होतं. त्यामुळे पुणे पंढरपूर ही वाहतूक जेजुरी मोरगाव नीरा अशी वळविण्यात आली होती. दिवसभर हे काम सुरू असल्याने पंढरपूर, फलटण, दहिवडी, गोंदवले आदी भागात गणेशोत्सवासाठि जाणाऱ्या भाविकांना चाळीस किलोमीटरचा वळसा मारावा लागला. आत रात्री नऊनंतर रेल्वेचे काम संपल्यानंतर पालखी मार्गावरील वाहतूक नियमित करण्यात आली असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.